Join us

SBI आणि फार्मा स्टॉक्सची मोठी झेप; 'या' २ निर्णयामुळे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:12 IST

Stock Market : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही बेंचमार्क निर्देशांक ०.४ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

Stock Market : घसरणीने सुरुवात झालेल्या शेअर बाजाराचा आठवड्याचा शेवट मात्र दमदार वाढीसह झाला. बेंचमार्क निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ०.४० टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील समभागांनी चांगली मजल मारली, तर माहिती तंत्रज्ञान आणि मेटल सेक्टरमध्ये नफावसुलीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स ३२९ अंकांनी वाढून ८२,५००.८२ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० इंडेक्स १०३ अंकांनी चढून २५,२८५.३५ च्या पातळीवर स्थिरावला.

मागील तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून झालेल्या जोरदार नवीन खरेदीमुळे बाजारात ही वाढ झाली आहे.

तेजीमागची दोन मोठी कारणे१. सार्वजनिक क्षेत्रातील धोरणात्मक बदलसरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिकांना आमंत्रित केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यक्षमता आणि प्रशासनात सुधारणा आणण्याच्या उद्देशाने हा एक मोठा धोरणात्मक बदल मानला जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना मोठी चालना मिळाली आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांनी उसळी घेतली.

२. फार्मा क्षेत्राला मोठा फायदाअमेरिकेने बायोसिक्योर कायद्याला पुनरुज्जीवित केल्यामुळे फार्मास्युटिकल समभागांमध्ये मोठी तेजी दिसून आली. या कायद्याचा उद्देश संशयास्पद परदेशी कंपन्यांशी (विशेषतः चीन) बायोटेक संबंध संपवणे हा आहे. याचा थेट फायदा भारतीय CDMO कंपन्यांना मिळत आहे.

आजचे टॉप गेनर्स स्टॉकआजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स पॅकमधील ३० पैकी २२ समभागांमध्ये वाढ नोंदवली गेली, तर ८ समभाग घसरले. बँकिंग क्षेत्रातील स्टॉक्स आघाडीवर राहिले.

समभागवाढ (टक्केवारी)
भारतीय स्टेट बँक२.१६%
मारुती सुझुकी१.७२%
ॲक्सिस बँक१.२५%
एनटीपीसी१.०७%
पॉवर ग्रिड१.०५%

वाचा - शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

दरम्यान, आता तिमाही निकाल सत्र सुरू होत असल्याने, पुढील दिशा निश्चित करण्यासाठी गुंतवणूकदार कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बारीक नजर ठेवून आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : SBI, Pharma Stocks Surge; Foreign Investors Buy Amid Policy Changes

Web Summary : Stock market ends week strong, led by SBI and pharma gains due to policy changes and US biosafety act. Foreign investors' buying boosted market. Investors eye quarterly results.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी